खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,30-05-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरिप हंगामासाठी आवश्यक खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचे वितरण व विक्री सुयोग्य पद्धतीने व्हावे यासाठी कृषी विभाग, वितरक आणि संबंधित यंत्रणाने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी वर्षभरातील पीक, खते, बियाणे याचे नियोजन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय समितीने सादर केले. त्यामुळे खरीपाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
यावर्षीच्या पीकामध्ये सोयाबीन, कापूस व इतर तृणधान्य पीकाच्या बियाणांचा आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध आहे. दुबार पेरणीची आवश्यकता पडल्यास बियाण्याची कमतरता पडणार नाही? असे नियोजन करुन देशी वाणाचे बियाणे वापरावर शेतकऱ्यांनी भर देण्यासाठी जाणीव जागृती व मार्गदर्शन करावे; अशा सूचना पाण्डेय यांनी यावेळी दिल्या. तसेच खताची ऑनलाईन विक्री प्रत्यक्ष मागणीनुसार होते की नाही याबाबत खातरजमा करावी. तसेच नॅनो युरिया वापराबाबत आवाहन करुन शेतकऱ्यांना तो वापराबाबतचे प्रात्यक्षिके करुन दाखवावीत,परवानाधारक खत पुरवठादार तसेच बोगस बियाण्याच्या विक्रीस प्रतिबंधासाठी दुकानाची तपासणी करावी. दोषी कंपन्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पीक विमा देण्याबाबतच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे निर्देश
तर तालुकानिहाय शेतकऱ्यांना बियाण्याविषयी तक्रार निवारण कक्षातून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असून पीकावर किटकनाशके फवारणी करतेवेळी सुरक्षिततेच्या उपाययोजना अंमलात आणण्याबाबत मार्गदर्शन करावे. युरिया, डीएपी खताचा बफर साठा वाढण्याबरोबरच पीक वीमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबतच्या त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी पीक विमा कंपनीस दिले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याबाबत तालुकास्तरावरुन परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे देखील त्यांनी संबंधितांना यावेळी सूचित केले.
बैठकीत यांची उपस्थिती:
दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, महाबीजचे क्षेत्र अधिकारी एस. खान, कृषि विकास अधिकारी प्रकाश पाटील, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी जगन्नाथ तायडे यांच्यासह विविध बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी तसेच खताचे वितरक या बैठकीस उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.