पोलीस दलात महत्वपूर्ण बदल्या!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,30-05-2023
छत्रपती संभाजीनगर:आयुक्तालयात नव्याने दाखल सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या पदस्थापनेसह सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली. वाळूज एमआयडीसीचे वरिष्ठ निरीक्षक संदीप गुरमे यांची गुन्हे शाखेत तर गुन्हे शाखेतील अविनाश आघाव यांना त्यांच्या जागेवर पाठविले आहे. नियंत्रण कक्षात संलग्न केलेले वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना उस्मानपुरा पोलिस ठाणे दिले. बदल्याचे आदेश पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी रात्री उशिरा काढले आहेत.
सहाय्यक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांना शहर विभाग, साईनाथ ठोंबरे यांना सिडको विभाग, धनंजय पाटील यांना गुन्हे शाखा, रणजित पाटील यांना उस्मानपुरा विभागाचा पदभार देण्यात आला. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ यांची विशेष शाखेत बदली केली. पोलिस निरीक्षकांमध्ये गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांची एम. वाळूज ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक झाली तर निरीक्षक संदीप गुरमे यांना गुन्हे शाखा देण्यात आली. विठ्ठल पोटे यांची सिटीचौक, वाळूज वाहतुक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बेगमपुरा, गिता बागवडे यांची वाळूज, अशोक गिरी यांची उस्मानपुरा, सचिन इंगोले यांची वाळूज वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्याशिवाय एम. वाळुजचे दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, वेदांतनगरचे ब्रम्हा गिरी आणि सायबरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांची तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्ती त्याचठिकाणी पूर्णवेळ केल्याचेही आदेशात म्हटले आहे.
वाचक क्रमांक :