By : Polticalface Team ,31-05-2023
मनपा उर्दू शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या मुलीचे लग्न लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लता जाधव यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी काय कार्यक्रम सुरू आहेे, अशी विचारणा केली असता, कुणी साखरपुडा, तर काही जण लग्न समारंभ असल्याचे सांगत होते. नवरीच्या पेहरावातील मुलीच्या पालकांकडे तिच्या वयाबाबत चौकशी केली असता, वयाचा पुरावा नसल्याचे खोटे सांगितले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, मुलीने ७ वीपर्यंतचे शिक्षण घेतल्याचे असून शाळेच्या कागदपत्रांवरून तिचे वय १३ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले.
मुलगी सात बहिणी-भावंडांत लहान असून नात्यातील मुलासोबतच लग्न लावत असल्याची कबुली दिली.मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीने विवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर, मुलाने स्वत: २० वर्षे वय असल्याचे समितीसमोर सांगितल्याने आई-वडिलांना अहमदनगर बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. वाचक क्रमांक :