मटणाचे पिस कमी वाढले म्हणून मित्रानेच हातपाय तोडून केली निर्घृण हत्या (योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,31-05-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गावात विचित्र घटना समोर आली असून, मटणाचे पिस कमी वाढल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राची थेट हत्या केली आहे. शेतात पार्टी करताना हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि मयत दोन्ही परप्रांतीय कामगार आहेत. जितेंद्र काशीराम धुरवे (वय 34 वर्षे, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी- ठाकूर (वय 35 वर्षे, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजय जगदीश रघुवंशी हे दोघे मित्र आहेत. दोघेही सिल्लोड तालुक्यातील धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मोलमजुरीसाठी आले होते. त्यामुळे शेतात लावलेल्या मिरचीची राखण करणे व इतर कामे करण्यासाठी त्यांना शेतात सालदार म्हणून ठेवण्यात आले होते. दरम्यान या दोघांनी सोमवारी रात्री मटणाची पार्टी केली. मात्र, मटणाचे पिस कमी जास्त घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी समजूत घालून तो सोडविला. त्यानंतर दोघेही शेतकरी घरी गेले.
स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचा वाद सोडवून घरी गेल्यावर, रात्री 11 वाजेदरम्यान पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी ओमजयने जितेंद्रचे हातपाय तोडून त्याचा खून केला व शेजारी शेतात झोपून राहिला. सकाळी दूध काढण्यासाठी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे शेतात आले असता, त्यांना जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी झोपलेल्या आरोपी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष