शेतात अवैधरित्या प्रवेश करून रोहित्र काढून नेण्याचा बेत आखणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करणे(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,31-05-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील येडू मनाळ यांनी दिनांक ९.१२.२०१७ रोजी महावितरण कडे एच व्ही डी सी अंतर्गत विद्युत कनेक्शनसाठी कोटेशन भरले होते. त्या अनुषंगाने सन २०२० मध्ये मुख्यमंत्री सोलार निधीमधून तीन एचपी सोलर मंजूर झाले व मिळाले त्यानंतर सन २.६.२०२१ साली एक रोहित्र एक शेतकरी या योजनेतून मनाळ यांना एक रोहित्र मिळाले त्यांचा ग्राहक क्रमांक-५०७४४२७१५६३४असा आहे व तेव्हापासून सदर विद्युतरोहित्र येडू मनाळ यांच्या शेतात आहे व महावितरण कडून रोहित्र सुरू करून दिले व त्यामुळे शेतात त्या अनुषंगाने पीक घेण्यासाठी शेतकरी मनाळ यांनी नियोजन केले व आज रोजी शेतात दोन एकर ऊस आहे व सदर उसाचा भरणा महावितरणच्या विजेवर सुरू आहे.शेतातील सोलरची मोटर मागील 3 महिन्यापासून जळाली असल्याने ती बंद आहे व आता महावितरणकडून मनाळ यांच्या शेतातील रोहित्र अवैधरित्या काढून नेण्याची तयारी महावितरण चे कर्मचारी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होईल? तसेच महावितरणच्या अशा अघोरी प्रकारामुळे सदरील शेतकऱ्याला मानसिक शारीरिक तसेच आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान होत आहे ते कधीही भरून न येणारे आहे. त्यामुळे महावितरणकडून दोन वर्षांपूर्वी रीतसर मिळालेले रोहित्र असे अचानक अवैधरीत्या काढून नेणे न्यायोच्छित नाही?तरीदेखील महावितरणचे कर्मचारी गट नंबर १३१ येथे वारंवार प्रवेश करून येडू मनाळ यांना रोहीत्र काढून नेण्याच्या धमक्या देत आहेत.तसेच वारंवार शेतात येऊन पिकाचे नुकसान करीत आहे.
तरी वीज महावितरण कंपनीने गांभीर्याने नोंद घेऊन शेतात परवानगीशिवाय अवैधरित्या प्रवेश करून शेतमालाचे नुकसान करत रोहित्र काढून नेण्याच्या बेतात असणाऱ्या महावितरण कर्मचारी तसेच इतरांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा. असे निवेदन येडू मनाळ यांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालय गंगापुर यांना दिले आहे.
वाचक क्रमांक :