By : Polticalface Team ,01-06-2023
छत्रपती संभाजीनगर शहरात एक आगळीवेगळ्या चोरीची घटना समोर आली आहे. शहरातील शहागंज भागात असलेल्या एका दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी काजू बदामवर ताव मारला आहे. यावेळी चक्क चोरट्यांनी 16 किलो काजू 10 किलो बदामावर ताव मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अब्दुल सलाम (रा. लोटाकारंजा) यांचे शहागंज भागातील भाजीमंडईत ए.आर. ट्रेडर्स नावाचे सुक्यामेव्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे 29 मे रोजी रात्री साडेदहा वाजता अब्दुल सलाम हे दुकान बंद करून घरून निघून गेले. 30 मे रोजी सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना दुकानाच्या वरचे पत्रे उचकटलेले दिसले. चोरांनी दुकानातील 11 हजार 250 रुपये किमतीची 1 किलो वजनाची काजूची 16 पाकिटे, 7 हजार 200 रुपये किमतीचे एक किलो वजनाची बदामाची 10 पाकिटे चोरून नेल्याचे दिसले. एकूण 18 हजार 450 रुपयांचे काजू बदामावर चोरट्यांनी ताव मारल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे मोहम्मद अब्दुल सलाम यांनी सिटी चौक पोलिसांना घटनेची माहिती कळविली.
पोलिसांनी दुकानाची पाहणी केली; त्यानंतर दुकानदाराच्या तक्रारीवरून काजू बदामावर ताव मारणाऱ्या चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वीही चोरट्यांनी एका घटनेमध्ये डाळी, ज्वारीचे पीठ चोरून नेले होते. त्याशिवाय एका किराणा दुकानातून विविध प्रकारच्या वस्तूही चोरण्यात आल्या होत्या. तर पुढील तपास सिटी चौक पोलिस तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न