हिंदू धर्म मागे राहायला विभक्त कुटुंबपद्धती कारणीभूत?ब्र.108 श्री. सद्गुरू डॉ.वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज!(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,01-06-2023
सध्या हिंदू धर्माच्या ऱ्हासास विभक्त कुटुंबंपद्धती कारणीभूत असून हिंदुधर्मीयांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करुण धर्माचा व कुटुंबाचा विकास व उद्धार करावा तसेच आपल्यावर जीवापाड प्रेम करुण हाताचा पाळणा करुण सांभाळ करणाऱ्या आई वडील यांचा सांभाळ करावा;आपणांस आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही कर्णपुत्र कुपुत्र जन्माला येऊ शकतो परंतु आजतगायत या पृथ्वीवर कुमाता जन्माला आलेली नाही व कधीही येणार नाही,आईच्या संस्कारातूनच संतान,कुटुंबं, देश, देव, धर्म यांचा उद्धार होतो पैसा आज आहे उद्या राहणार नाही? पुन्हा येइल जाईल त्यामुळे कुटुंब व समाजावर निरपेक्ष भावनेने प्रेम करा असा उपदेश उपस्थिताना ष.ब्र.108 श्री. सद्गुरू डॉ.वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज (श्रीक्षेत्र मन्मथधाम स्वामी आश्रम मांजरसुंबा जि.बीड)यांनी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे संतोष व सतीश अप्पा हिंगमिरे यांच्या संकल्प सुपर मार्केटच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केला.
दरम्यान सकाळी साडेअकरा वाजता महाराजांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम महाराजांचे हिंगमिरे कुटुंबियाकडून गुरुपूजन करुण पाद्यपूजन करण्यात आले.तदनंतर संतोष व सतीश हिंगमिरे यांच्या मातोश्री विमलबाई भागीनाथअप्पा हिंगमिरे यांच्याशुभहस्ते संकल्प सुपरशॉपीचे उदघाट्न करुण शुभारंभ करन्यात आला.लासूर स्टेशनला किराणा,विविध प्रकारचे तांदूळ, गोडेतेल, भेटवस्तू महिलांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गृहउपयोगी वस्तू अगदी नां नफा नां तोटा यां तत्वावर मिळणार असल्याने चोखंदळ महिलांसाठी ही संकल्प सुपर शॉपी मैलाचा दगड ठरणार असल्याचे संचालक संतोष अप्पा हिंगमिरे यांनी मी मराठीशी बोलताना सांगितले.या प्रसंगी लासूर स्टेशन शहरासह पंचक्रोशीतील गावकरी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :