घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी चव्हाण यांना देखील ईडीची नोटीस(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,03-06-2023
छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल प्रकरणात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे समजते. या योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता.
घरकुल घोटाळा प्रकरणात ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर मनपा अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
महापालिकेने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. फेब्रुवारी 2022 मध्ये टेंडर निघाल्यानंतर समरथ मल्टिबीज इंडिया प्रा. लि., इंडग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व जग्वार ग्लाेबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी एकाच ‘आयपी अड्रेस’वरून टेंडर भरले. यातून कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या ते तयारीत होते. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्याच्या न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडण्यात आले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले.
देशात इतर ठिकाणी घरकुल बाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजी नगर मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :