आधी सासू, त्यानंतर अल्पवयीन मेहूणीसोबत अश्लील चाळे; मेहुण्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,03-06-2023
छत्रपती संभाजीनगर शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वाळूज महानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मेहूणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मेहुण्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या आरोपी मेहुण्याने आपल्या सासूची आणि बायकोच्या आजीची देखील छेड काढली होती. त्यामुळे अखेर त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीता ही कुटुंबासह वाळूज महानगरात वास्तव्यास असून, तिच्या बहीणचे लग्न झाले आहे. लग्नानंतर पिडीतेचा मेहुणा हा सासुरवाडी असलेल्या वाळूज महानगरात अधून-मधून येत होता. अशातच 24 मे रोजी पिडीतेचे आई-वडील कामासाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान यावेळी पिडीतेचे आजी, भाऊ व दोन बहिणी घरात होत्या. दरम्यान, सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी मेहुणा हा वाळूज महानगरात सासुरवाडीत आला होता.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याने अल्पवयीन मेहूणीला बोलावून पिण्यासाठी पाणी मागितले. तिने मेहुण्याला पाणी पिण्यासाठी दिले असता त्याने तिचा हात ओढून जवळ घेतले. यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू केल्याने तिने विरोध केला. या विरोधाला न जुमानता तो अश्लील चाळे करतच होता, पण यावेळी आजीने आवाज दिला. त्यावेळी घाबरलेल्या आरोपी मेहुण्याने मेहूणीचा हात सोडून दिला. यानंतर सायंकाळी सहा वाजता तो आपल्या पत्नीला घेऊन सासुरवाडीतून निघून गेला.
दरम्यान या सर्व घटनेने पीडिता प्रचंड घाबरून गेली होती. त्यामुळे आई घरी येताच तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीही देखील आपल्या सासूची व पीडिताची आजीची छेड काढली होती. मात्र, बदनामी होण्याच्या भीतीने त्यांनी या कृत्याची कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र मुलीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून पीडिताच्या आईने जावईच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्याला काळीमा फासणारी घटना...
वाळूज भागात घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. स्वतःच्या साली, सासू आणि आजी सासूची छेड काढल्याचं घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. सासूरवाडीत गेल्यावर तेथील महिलांवर या आरोपीची वाईट नजर असायची. दरम्यान हा प्रकार अधिकच वाढल्याने अखेर आरोपी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :