वीज पडून तीन जनावरे ठार,शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान!(योगेश मोरे,मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,04-06-2023
छत्रपती संभाजीनगर मधील रायपूर येथे दि. 04/06/23 रविवारी रोजी दुपारी 02:00 वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. यावेळी रायपूर -माळीवाडगाव रोडवरील निकम वस्तीवरील अंबादास निकम यांचे दोन बैल व एक गाय अशी तीन मोठी जनावरे जागीच ठार झाली आहे. यामुळे सदर शेतकऱ्याची मोठी हानी झाली आहे.जवळजवळ लाख सव्वा लाखाचे नुकसान सदरील शेतकऱ्याचे झाले असून,पहिल्याच अवकाळी पावसाने रायपूर वाशीयांना मोठा दुःखद धक्का दिला आहे. शासनाने त्वरित सदरील शेतकऱ्याला भरीव मदत करावी!अशी मागणी सर्व गावकरी तथा शेतकरी वर्गातून होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील बाबासाहेब जाधव,मंडळ अधिकारी वाघ, तलाठी श्रीमती म्हस्के,, डॉ.खटाव,सरपंच पती गणेश देशमुख, ज्ञानेश्वर सोमासेसह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी धाव घेतली.
वाचक क्रमांक :