लासूर स्टेशन येथे हर घर नल से जल योजनेअंतर्गत कामाचे उद्घाटन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,05-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ केंद्र लासुर स्टेशन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जल जीवन मिशन उपक्रम अंतर्गत हर घर नल से जल या योजने अंतर्गत लासुर स्टेशन गावासाठी तीन कोटी 67 लक्ष रुपयांच्या कामाचे शुभारंभ भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी आमदार प्रशांत बंब यांनी आता मतदारसंघासह लासुर स्टेशन गावातील तसेच नवीन वाढत्या वसाहतीमध्ये प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार असा विश्वास सर्व जनतेस दिला.यावेळी सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सर्व संचालक तसेच सर्व गावकरी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :