बस चालक-वाहकाचा मनमानी कारभार ! गंगापूर बसस्थानकावर गाडी नेण्यास नकार(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,05-06-2023
सर्व लांब पल्ल्याच्या बस गाड्यांना बसस्थानकात येणे अनिवार्य करावे प्रवासीवर्गातून मागणी!
काही लांब पल्ल्याच्या बसचे चालक-वाहक गंगापूर बसस्थानकावर बस न नेता छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनच वैजापूर मार्ग बाहेरूनच बस नेत असल्याने प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत. वास्तविक पाहता, सर्व गाड्यांना गंगापूर बसस्थानकात बस आणणे अनिवार्य असताना काही चालक-वाहकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर जालना, परतुर, जाफराबाद, सिल्लोड, अकोला, गंगाखेड, हिंगोली,
आदी ठिकाणची बससेवा गंगापूरमार्गे नाशिकला जातात; या सर्व बसेसला एसटी महामंडळाने गंगापूर बसस्थानकात बस आणणे अनिवार्य असताना काही चालक आणि वाहकांकडून अजूनही प्रवाशांशी हुज्जत घालून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोडले जात आहे. वास्तविक पाहता कोरानाच्या काळात बससेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक महिने कामगारांचे वेतन करणेही शक्य झाले नव्हते. त्यानंतर ही घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असताना प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळ विविध योजनांची अंमलबजावणी करते. एसटीला प्रवाशी मिळावे व ज्यादा नफा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने योजना अमलात आणले आहे.
दि. ३ जुन शनिवार रोजी छत्रपती संभाजीनगर नाशिक बस गंगापूर मार्ग वैजापूर कडे जात असताना चालक-वाहकांच्या मनमानीपणामुळे बसमध्ये बसलेल्या ७ ते ८ प्रवाशांना भर दुपारी कडक उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरुन दिले. विशेष म्हणजे चालक आणि वाहकाने प्रवाशांन बस गंगापूर बसस्थानकावर जाणार नसल्याचे कारण सांगत खाली उतरविले. विशेष म्हणजे या गाडीत अवघे दहा ते बाराच प्रवासी होते. तेवढ्याच प्रवाशांना घेऊन ही बस वैजापूर मार्गस्थ झाली,आणि काही प्रवासी वैजापूर नासिक जाण्यासाठी बसस्थानकावरच बस ची वाट पाहत बसले,
अश्या काही वाहक आणि चालक प्रवाशांना नाहक त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
तसेच सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसस्थानकात येणे अनिवार्य करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष