वेरूळमध्ये पर्यटकांना मिळणार स्वस्तात खाद्यपदार्थ!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,05-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणीतील कॅन्टीन येत्या ३ महिन्यांत सुरू होणार असून, पर्यटकांना त्यामुळे खासगी हॉटेलच्या तुलनेत स्वस्तात खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. गेल्या अनेक महिन्यांपासून लेणीतील कॅन्टीन डागडुजीअभावी बंद होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने कॅन्टीनच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून, सध्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही कॅन्टीन करारपद्धतीने कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. मात्र तेथील खाद्य पदार्थांचे दर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नियमावलीनुसार असतील.
देश-विदेशातून रोज साडेचार हजार पर्यटक लेणी पाहण्यासाठी येतात. या पर्यटकांना पाण्याची बाटली, नाश्ता व इतर पदार्थ लेणी बाहेरच्या परिसरातील हॉटेल्समधून खरेदी करावे लागतात. खासगी हॉटेल पर्यटकांना जादा दराने खाद्यपदार्थ विकतात. परिणामी पर्यटकांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे लेणी परिसरात असलेली कॅन्टीन सुरू करण्याची मागणी पर्यटकांची आहे.
वाचक क्रमांक :