छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव परिसरात कार आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. वैजापूरकडून जाणारी बस आणि छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या कारमध्ये जोरदार धडक झाली.
यात पवार दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये पवार पती, पत्नीचा जागीचा मृत्यू झाला आहे. हंसराज पवार आणि सुलोचना पवार अशी मृत व्यक्तींची नावे आहे. तर त्यांचा मुलगा मनोज पवार आणि सून माया पवार हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :