नापास विद्यार्थ्यांचा सत्कार, गाण्यावर ठेकाही धरला; अजब कार्यक्रमाची चर्चा!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,06-06-2023
परीक्षेचा निकाल जाहीर झाला की काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. मात्र हा निकाल आपलं संपूर्ण आयुष्य होत नाही. अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन आणि वेगळे प्रयोग करुन जीवनाच्या परीक्षेत टॉपवर असतात.नापास झालेल्या विद्यार्थांना मानसिक आधाराची गरज असते. त्यासाठी काही ठिकाणी पावलेही उचलली जातात. असेच एक पाऊल छत्रपती संभाजीनगरमध्ये उचलण्यात आलेय. नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नापास झालेले आणि कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याचं आणि कमी मार्क पडल्याचं टेंशन जुगारून ही पोर बिनधास्त नाचली. कारण होत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या फेल्युअर पार्टीचे... चांगले गुण मिळणाऱ्यांचे कौतुक सर्वत्र होते. मात्र नापास झालेली आणि कमी मार्क पडलेल्या मुलांचं मानसिक खच्चीकरण होतं. त्यामुळेच त्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि एखाद्या परीक्षेत नापास झालं तर सगळंच काही संपत नाही हा यासाठी या पार्टीचे आयोजन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं.
या पार्टीत ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सुरुवातीला या पार्टीत येणाऱ्या मुलांचं गुलाबाचं फुल देवून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर 12 वी मध्ये नापास होवूनही यशाची शिखर गाठणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन झालं. मग पार्टी झाली. मुलांच्या आनंदात सहभागी होताना आयुक्त जी श्रीकांत यांनीही ठेका धरला. या पार्टीनंतर मुलं सकारात्मक उर्जा घेऊन मुलं घरी परतली. बारावी परीक्षेत नापास आणि कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आशा प्रकारे फेल्युअर पार्टीचे आजोजन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पार्टीमुळे नापास आणि कमी मार्क पडल्यामुळे जे नैराश्य आलं होतं, या नैराश्यातून मुलांचा प्रवास स्कारात्मकतेकडे होईल.
फेल्युअर पार्टीचे आयोजन:
वर्षभर TV घरात बंद होता. अभ्यास करत होतो पण परीक्षेचीच भिती वाटत होती. त्या भीती आणि अपेक्षांमुळे गुण कमी आले. पण खचलो नाही. ही काही निवडक विद्यार्थ्यांची ही प्रातिनिधीक उदाहण आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांच्या संकेल्पनेनुसार शहरात बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सिडकोतील लाईट हाऊस येथे विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच फेल्युअर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. साधारणपणे दहावी-बारावीचे वर्ष म्हटले की प्रत्येकांच्या घरात शांतत, स्वप्नांचे आणि करिअरचे ओझे सांभाळत मुलांनी चांगले गुण मिळवावे अशी अशा व्यक्त केली जाते. चांगले गुण मिळणाऱ्यांचे कौतुक सर्वत्र होते. पण कमी गुण मिळाले अथवा अपश आले तर सर्वजण बोलतात, अबोलाही धरतात. परंतु जे मिळाले ते अपयश नाही. यशाच्या पहिल्या पायरीची सुरुवात आहे. जसं यश साजर करतो, तसं अपयशाला देखील सामोरे जात पुढे आले पाहिजे. यासाठी खास ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळालेले नाही. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व भविष्याची दिशा देण्यासाठी मनपा प्रशासक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली फेल्युअर पार्टी घेण्यात आली. यात ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अपयशातून कसे यश मिळवले मेहनतीवर विश्वास ठेवा असा संदेश आर.जे. अर्चना गायकवाड, पत्रकार कृष्णा केंडे, पवन कुमार, अनंत सोनेकर, उपायुक्त नंदा गाकयवाड यांनी दिला;यावेळी काही गेम विद्यार्थ्यांचे घेण्यात आले. मनोगत विद्यार्थ्यांनी देखील मांडले.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी
रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.
लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव
आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन
के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.
स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत
विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.