बीआरएसपीच्या वतीने प्रकरणी नांदेड हत्याकांड प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,06-06-2023
दि. 6/6/2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.अक्षय भालेराव खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्याबाबत मौजे बोंडार (हवेली), जि.नांदेड येथील अनुसूचित जातीचा तरुण अक्षय भालेराव याने गावामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने त्याचा राग मनामध्ये ठेवून सदर गावातील काही समाज कंटकांनी जातीयद्वेष भावनेतून दि.०१/०६/२०२३ रोजी सायं. ७ ते ७.३० वाजेच्या दरम्यान खंजर व तलवारीने वार करुन त्याचा खुन केला;त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संताप असून असंतोष आहे.या असंतोषाचा कधीही उद्रेक होवू नये,याची शासन, प्रशासनाने गंभीर दखल घेवून गुन्हयातील समाविष्ट आर पींविरुध्द कडक शासन करण्यात येवून त्यांना फाशीची शिक्षा होईल, अशा पध्दतीने तपास करण्यात यावा?सदरील घटना ही अमानवी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे, त्याचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने तिव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच पुढील मागण्यांबाबत गांभिर्याने विचार करण्यात येवून तात्काळ निर्णय घेण्यात यावा; या मागणीचे निवेदन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाअध्यक्ष विजय शिनगारे, प्रदेशमहासचिव अरविंद कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष अनामी मोरे यांनी दिले.
वाचक क्रमांक :