दहावीमध्ये माधुरी व पूर्वा यांनी प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सत्कार संपन्न!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय)
By : Polticalface Team ,06-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत दहावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या माधुरी अंबादास गायकवाड व पूर्वा सुभाष मिश्रा या दोन्ही विद्यार्थिनीने सारखेच गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला;500 पैकी 436 87.20 टक्के मिळवल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी कायगाव सोसायटीचे चेअरमन संजय पाटील गायकवाड, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गवळी कायगावकर,शिवबा संघटना देविदास पाटील पाठे, शिवसेना नेते नवनाथ पाटील काकडे,तंटामुक्त अध्यक्ष बाबासाहेब साळवे, बंडुभाऊ डहाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :