शेतकऱ्यांचे शोषण थांबिण्यासाठी व हमीभावासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,07-06-2023

शेतकऱ्यांचे शोषण थांबिण्यासाठी व हमीभावासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) कन्नड तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव व उपसचिव यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती मालमत्ता मिडीया व जनतेसमोर जाहिर करून सर्व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल शासकीय हमी भावाप्रमाणे खरेदी करून जागेवर पेमेंट करून शेतकऱ्यांची लुटमार थांबविण्याचे आदेश देण्यात यावे? जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे कि, कन्नड कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामिण भागातील शेतकरी आपला शेतमाल आणत आसतात. शेती करताना बँका खाजगी व्यक्ती सावकार यांच्याकडुन कर्ज काढुन संपूर्ण कुटुंब शेतात राबुन कपाशी मक्का अद्रक सोयाबिनसारखी पीके घेतात.शेतमाल काढतात;मात्र बाजारात या शेतमालास योग्य सोडा शासकीय हमी भाव सुध्दा मिळत नाही? अनेकवेळा तर त्याना शेतातुन बाजारात शेतमाल नेण्याचे भाडे सुध्दा मिळत नाही; 1] व्यापारी शेतकऱ्यांची अडवणुक वअज्ञानाचा फायदा घेत मातीमोल भावाने शेतमाल खरेदी करतात. बंधनकारक शासकीय हमी भाव सुध्दा देत नाही; सर्व व्यापारी शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचे सक्तीचे आदेश द्यावेत 2] व्यापाऱ्याच्या पेढीवर शेतमालाचे हमी भाव नसल्याने मनमानी पद्दतीने खरेदी करून शेतकऱ्यांचे व्यापाऱ्याकडुन शोषण होते. त्यामुळे खरेदी करिता व्यापाऱ्याच्या पेढीवर हमीभाव सद्याचा भाव याची दररोज व प्रत्येक लिलावा वेळी नोंद घेण्याकरीता प्रत्येक व्यापाऱ्यास बंधनकारक करण्यात यावे.3] व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे लिलाव व भाव याची कोणतीही लेखी नोंद माहिती देत नाहीत. पावतीवर लिलाव बोलीची कोणतीही माहिती नसते.याचा गैरफायदा घेत व्यापारी लिलावपेक्षा कमी दराने माल खरेदी करतात. 4] समितीचे भूखंड व गाळे व्यापाऱ्यांना शेती पुरक व्यवसायाकरीता देण्यात आलेले आहे. या गाळे भुखंडाचे अटी शर्ती भाडे, रक्कम मासिक भाडे, वसुली, वार्षिक भाडे रक्कम याची सविस्तर माहिती देण्यात यावी व गाळे व भुखंडनिहाय धारकासे नावे भाड्याची रक्कम, भाडे कराराचा कालावधी, भाडे करार समाप्त होण्याची तारीख यासह यादी लावावी? निवेदनातील सर्व मागण्यावर तत्काळ कारवाई करून 15 दिवसात मागण्याची पुर्तता करून शेतकऱ्यांची अडवनुक आर्थिक शोषण थांबवावे या कामी दिरंगाई विलंब टाळटाळ झाल्यास वेळेत कार्यवाही होऊन शेतकऱ्यांचे शोषण न थांबल्यास जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या आदेशानुसार व छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हासंपर्क प्रमुख अनिल शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय पाटिल वाघ यांच्या अध्यक्षतेखालील संघट्नेचे पदाधिकारी शेतकऱ्यांसह कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यालय कन्नड येथे अनोख्या स्वरूपात आंदोलन करतील असे निवेदन तहसिलदार व कृषि उत्पादन बाजार समितीचे सचिव यांना देण्यात आले.या वेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हासंपर्क प्रमुख अनिल शेळके पाटील,कन्नड तालुकाप्रमुख अशोक पवार,कन्नड शहर अध्यक्ष सहिद पवार, कामगार आघाडी तालुकाप्रमुख साडु सुरे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख महेश पा दळवी व इतर पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.