नगिनापिंपळगाव येथे नविन आरोग्य उपकेंद्राला सरकारची मंजुरी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,07-06-2023
गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगावची सातत्याने आरोग्य उपकेंद्राच्या मागणीसाठी नगिना पिंपळगावच्या मातीशी नाळ असलेले व तेथील भूमिपुत्र सिद्धार्थ त्रिभुवन यांनी सातत्याने सरकारी दरबारी जाऊन या कामाचा पाठपुरावा केला, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्य उपकेंद्राला विशेष बाबीमधे (शासन निर्णय क्रं: उपकेंद्र-२०१९/प्र , क्रं , २००/आरोग्य -४ ) असा स्वतंत्र जी आरच पारीत मंजूर करून घेतला होता व वेळोवेळी निधी मिळण्यासाठीही पाठवूरवठा करून ६० लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सिद्धार्थ त्रिभुवन व गावकऱ्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले. या आरोग्य केंद्राच्या कामाला टेंडर प्रौशिजरची सुरुवात झाली असून वैजापूर तालुक्याच्यावतीने आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने सिद्धार्थ भाऊ त्रिभुवन यांचे विशेष अभार व्यक्त होत आहे, उपसरपंच शिरीष त्रिभुवन यांचे ते लहान बंधू आहेत.
वाचक क्रमांक :