अपात्र ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा संधी द्या : अरुण जोनवाल(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,07-06-2023
संभाजीनगर जिल्ह्यातील साडेनऊशे ग्रामपंचायत सदस्यावर अपात्रेतीची कार्यवाही करण्यात आली आहे. या अपात्र सदस्यांना पुन्हा संधी देण्यात यावी?आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक होते. यासाठी १७ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. काही सदस्यांनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र दाखल केले, मात्र अहवाल यापूर्वीच गेल्याने सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही करण्यात आली आहे.
अपात्रतेच्या मुदतीआधी अनेक सदस्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र आहे. शिवाय उमेदवारी अर्ज दाखल करताना काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र जोडले आहे.
ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व जात वैधता प्रमाणपत्र सादर मुदतीमध्ये न केल्याने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अपात्र ठरले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जानेवारी २०२१ मधील राखीव प्रवर्गातील निवडून आलेले १९९८ ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेल्या वाढीव मदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. शासनाने दिलेल्या मुदतीपूर्वी व उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेल्या जात वैधता प्रमाणपत्र याची चौकशी करावी व अपात्र सदस्यांना पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाचिटणीस अरुण जोनवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे केले आहे.
वाचक क्रमांक :