शिवमहापुराण कथास्थळी 17 मंगळसूत्रांची चोरी;7 दिवसांत 50 हून अधिक मोबाइल लांबवले(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,08-06-2023
छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी भागात १ ते ७ जूनदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मराठवाड्यातून लाखो भाविक दररोज हजेरी लावत होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी सात दिवसांत १७ महिलांचे मंगळसूत्र तर ५० भाविकांचे मोबाइलही लंपास केले. विशेषत: कथा सुटल्यानंतर सायंकाळी कार्यक्रमस्थळावरुन निघताना चोरट्यांनी हातसफाई केली. चोरीस गेलेल्या सोन्याचा ऐवज सुमारे ३० तोळे असून त्याची किंमत अंदाजे १८ लाख रुपये आहे.
पहिल्या दिवशी ६ लंपास
१ जून - ६ मंगळसूत्र चोरी. २ जून- चार, ४ जून रोजी- दोन, ६ जून रोजी- एक, तर शेवटच्या दिवशी ७ जूनला ४ मंगळसूत्रांची चोरी झाली. ३ व ५ जून रोजी मात्र एकाही दागिन्याची चोरी झाली नसल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले.
वाचक क्रमांक :