By : Polticalface Team ,08-06-2023
महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान सुरू केले असून, या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सर्वोत्तम कामगिरीबद्दल २ कोटींचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मागील वर्षीही मनपाने दोन कोटींचा पुरस्कार पटकावला होता.पृथ्वी, वायू, जल, अग्नी,आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले. माझी वसुंधरा ३.० अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था, १६,४१३ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. लोकसंख्यानिहाय ११ गटांतील विजेते निवडण्यात आले. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये संभाजीनगर महापालिकेला विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सोमनाथ जाधव, उद्यान अधीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात व संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग व ड्रेनेज विभाग यांनी यासाठी मेहनत घेतली.
शहराच्या जमेच्या बाजू:
शहरातील विविध भागांत वृक्षारोपण, झाडे टिकविणे.
घनकचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प.
नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे.
शहर सौंदर्यीकरणाकडे गांभीर्याने दिलेले लक्ष.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कारंजे व्हर्टिकल गार्डन.
खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेणे.
पारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर, विजेची बचत, सोलर पॅनल.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न