संभाजीनगरमध्ये होणार 27 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम: जी.श्रीकांत(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,09-06-2023

संभाजीनगरमध्ये होणार 27 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम: जी.श्रीकांत(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियम येथील सुमारे 27 एकर जागेवर अंदाजीत 100 ते 150 कोटी खर्च करून एक भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे;तर या नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमबाबत महापालिकेचा मानस असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी दिली आहे. आम्हाला खेळू द्या!या संकल्पनेतून महानगरपालिका मंजूर लेखांकनात खुल्या जागा किंवा ओपन स्पेस आणि मैदान लोकसहभागातून आणि श्रमदानातून लहान मुलांसाठी विकसित करण्यात येणार आहे. या निमित्ताने आयुक्तांनी शहरातील क्रीडाशी संबंधित प्रत्येक घटकाची एक बैठक आज स्मार्ट सिटी कार्यालय येथे घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, लॉन टेनिस, रनिंग आणि इतर क्रिडाक्षेत्रांसाठी अंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट किंवा मैदान विकसित करण्याचे मानस आहे. मुलांच्या हातात मोबाईल किंवा दगड ऐवजी मी चेंडू बघू इच्छितो. आम्हाला खेळू द्या या संकल्पनेचा हेतू तरुण पिढीला मोबाईल टीव्ही आणि व्यसनापासून दूर ठेवने हे आहे;याशिवाय क्रीडा क्षेत्रातील तरुणांना शासकीय आणि खाजगी नोकऱ्या आणि रोजगार मिळण्याची जास्त संधी असते. ज्या ज्या वसाहतीत खुल्या जागा उपलब्ध आहे; परंतु ते अस्वच्छ आहे किंवा तिथे अतिक्रमण झालेले आहे अशा जागा महानगरपालिका लोकसहभाग आणि श्रमदानातून मोकळी करून देणार आहे.त्यांची देखरेख व जबाबदारी त्या परिसरातील नागरिकांवर राहील. यासाठी महानगरपालिका खुल्या जागा दत्तक देण्यासाठी एक पॉलिसी तयार करणार आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्तांनी बैठकीतील उपस्थित विविध क्रीडा क्षेत्रातून आलेले खेळाडू आणि तज्ञ तसेच प्रशिक्षक यांच्याकडून सल्ला देखील मागितला आहे.या दिशेने आपण काय करू शकतो याबाबत त्यांनी लेखी अहवालाच्या माध्यमातून त्यांना कळविण्यासाठी आवाहन केले आहे. आराखडा तयार करण्याच्या सूचना: याशिवाय ज्या मोठ्या जागांवर खेळण्याचे मैदानाचे आरक्षण आहे किंवा खेळण्याचे मैदान अस्तित्वात आहे त्यांना देखील विकसित करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तर या बैठकीत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो कराटे, जुडो, स्विमिंग, बुद्धिबळ कुस्ती, सायकलींग इत्यादी प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू आणि तज्ञ यांची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न