शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी ह.भ.प कडुबाळ महाराज गवांदे(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,15-06-2023
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील ह.भ.प. कडुबाळ महाराज गवांदे यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या धर्मवीर अध्यात्मिक सेना - जिल्हाप्रमुख पदी ( कार्यक्षेत्र -
छत्रपती संभाजीनगर) नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धर्मवीर अध्यात्मिक सेना - जिल्हाप्रमुख पदी -नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई येथील शिवसेना भवनात ह.भ.प.गवांदे महाराज यांना नियुक्तीपत्र शिवसेनेचे सचिव संजय मोरे, वैजापूरचे आमदार बोरनारे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी लासूर स्टेशन बाजार समितीचे उपसभापती तथा तालुकाप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हा समन्वयक बाळासाहेब चव्हाण,उपतालुका प्रमुख प्रकाश मतसागर आदिची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :