By : Polticalface Team ,17-06-2023
गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना घडली होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा बूट भटक्या कुत्र्याने पळवला होता. त्या चोर कुत्र्याच्या शोधासाठी पालिकेची यंत्रणाच कामाला लागली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन संशयित कुत्र्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील चोर कुत्रा कुठला हे मात्र समजत नव्हते. अखेर त्या कुत्र्याची ओळख पटली आहे. त्याला पकडून सेंट्रल नाका लॉकअप मध्ये ठेवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील एका बहाद्दर अधिकाऱ्याने फोनसाठी तलावातून पाणी उपसले होते. या संतापजनक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना समोर आली. माजी महापौर असलेले घोडेले यांचा १५ हजार रुपयांचा बूट भटक्या कुत्र्याने पळवला.
तक्रारीनंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन संशयित कुत्र्यांना ताब्यात घेतले. त्यातील खरा चोर कुत्रा शोधण्यासाठी श्वान पकडणाऱ्या पथकाची दमछाक झाली. आता चोर कुत्र्याची ओळख पटली आहे. त्यांचे इतर साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांना सेंट्रल नाका येथील कोंडावड्यात ठेवले आहे.
आता चोर कुत्रा सापडला असला तरी त्याने पळवलेला बूट मात्र काही हाती लागलेला नाही. या कुत्र्यावर काय कारवाई होणार याकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कुत्र्याची नसबंदी करून त्याला सोडण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न थांबणार का, असा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
माजी महापौरांचा बूट सापडत नसल्याने यंत्रणेला त्रास सहन करावा लागला. याच्या निषेधार्थ एमआयएम पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी घोडेले यांच्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून आठ क्रमांकाचा १४ हजार ९९९ रुपयांचा बूट खरेदी करून दिला.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न