By : Polticalface Team ,17-06-2023
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांच्या शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी करुन आणि ॲट्रॉसिटीच्या धमक्या देऊन खंडणी मागण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाढल्या असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून, आता कारवाईला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एकाला पोलिसांनी तडीपार केले आहे. शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी करुन उद्योजकांना त्रास देणे आणि ॲट्रॉसिटीच्या धमक्या देऊन खंडणी मागत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अशोक भाऊसाहेब वाहुळ (वय 30 वर्ष रा. सहारा कॉलनी सिडको महानगर 1 वाळूज) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज हद्दीत राहणारा अशोक भाऊसाहेब वाहुळ याच्याविरुद्ध 2022 ते 2023 या कालावधीत शेजाऱ्यांसोबत वाद घालून त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, एमआयडीसी वाळूज परिसरातील कारखानदारांच्या कंपनीत जाऊन त्यांच्या शासकीय कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करुन त्यांना त्रास देणे, तसेच ॲट्रॉसिटीच्या नावाखाली खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करणे, असे गुन्हे दाखल आहेत. तसंच 2 दखलपात्र आणि 1 अदखपात्र गुन्ह्याची देखील नोंद आहे.
दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
अशोक वाहुळच्या वाढत्या गुन्हेगारी वर्तनामुळे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव पाठवला होता. तर अशोक भाऊसाहेब वाहुळ याची वाळूज एम आय डी सी पोलीस ठाणे तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिक, कारखानदार, कामगार यांचे जीवितास आणि मालमत्तेस नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात भय, धोका, इजा निर्माण होऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर भविष्यात त्याने गुन्हे आणि गैरकृत्य करु नये, गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसावा, सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहावा म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (अ) (ब) अन्वये विहीत केलेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी त्यास दोन (2) वर्षाकरीता संभाजीनगर शहर तसेच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
कारखानदार आणि व्यवसायिकांकडे पैशांची मागणी
तर अशोक भाऊसाहेब वाहुळ हा अतिशय हिंस्त्र, भांडखोर, क्रूर स्वभाव तसेच बळाचा वापर करुन गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला वेळोवेळी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील केलेल्या आहेत. तरी देखील अशोक वाहुळच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याने गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवले, सर्वसामान्य नागरिकांना साथीदाराचे मदतीने शिवीगाळ करुन लाठ्याकाठ्याने मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्त्यात अडवून अन्यायाची आगळीक करणे, वाळूज एमआयडीसी हद्दीतील कारखानदार आणि व्यावसायिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी करणे, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न