शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,17-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकबुर्जी वाघलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.16/06/2023 रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असुन गावातील नविन सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला.अगदी खेळीमेळीच्या वातावरणात गाडीबैल सजवून नवीन विद्यार्थ्यांची गाडीबैलांतून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पालक जागा हो..! जिल्हा परिषद शाळेचा धागा हो..!अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी गावाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनतर शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी शालेय प्रांगणात शालेय समिती अध्यक्ष कृष्णा बनसोड, उपाध्यक्ष रुपालीताई अरुण बनसोड, भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी चे अरुण जोनवाल, ग्रामपंचायत सदस्य संतोष हजारे,गणेश कुकलारे, जीवन बहुरे, पोलीस पाटील विलास बनकर, शाळेचे मुख्याध्यापक कवडे,शिक्षिका आदी गावकरी व विद्यार्थी पालक महिला उपस्थित होते.
वाचक क्रमांक :