सर्व शाळा इंग्रजी माध्यमात करा! एमआयएम विद्यार्थी आघाडीची मागणी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,17-06-2023
छत्रपती संभाजीनगर शहरातील मनपाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सर्व शाळांना इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांना निवेदन देण्यात आले आहे.
खाजगी शिक्षण संस्थाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून ते खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना देत असल्याने मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या कमी होत चालली आहे. खाजगी शाळांची फीस बघितली तर लाखोंच्या घरात आहे आणि ही फीस गरीब होतकरू विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भरणे शक्य होत नाही. त्यामुळे मनपामार्फत चालवणाऱ्या सर्व शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू भाषेच्या अभ्यासासहित दर्जेदार इंग्रजी माध्यमात शिक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून योग्य कारवाई करणार असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले आहे. यावेळी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.कुणाल खरात, गट नेता नासेर सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहर अध्यक्ष शारेक नक्षबंदी, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अब्दुल रहमान अलम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :