जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,17-06-2023
जायकवाडी धरण बांधल्यानंतर प्रथमच या धरणाचा गंगापूर खुलताबाद मतदार संघाला फायदा मिळवुन देणारे आमदार प्रशांत बंब यांनी जे धेय्य घेवून राजकारणात पाय ठेवला त्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे मतदासंघातील प्रत्येक गावाला नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे! ते काम साध्य करणाऱ्या जल जीवन मिशन योजनेच्या 878 कोटी रुपयांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच होणार आहे.
दिनांक 30/6/2023रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 878 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. आज सदर कामाचे उद्घाटन होणारे स्थळ गंगापूर येथे अधिकाऱ्यांसह भेट देवून पाहणी आमदार प्रशांत बंब यांनी केली.
वाचक क्रमांक :