विश्व हिंदू परिषदेचा सामुदायिक हनुमान चालिसा व धर्म जागृती संमेलन संपन्न(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,18-06-2023
विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताच्या वतीने मांगेगाव ता.गंगापूर येथे व प्रवरासंगम ता.नेवासा येथे भव्य सामुदायिक हनुमान चालीसा व धर्म जागृती संमेलन पार पडले. तसेच युवा कीर्तनकारांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वारकरी सांप्रदाय अध्यात्मिक संस्कार शिबिर आयोजित केले होते;अशा अनेक युवा कीर्तनकारांचा विश्व हिंदू परिषदेतर्फे लिंबेजळगाव येथे सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड , शिवाचार्य परमपूज्य डॉक्टर विरुपाक्ष स्वामी, महंत पूजनीय कैलासगिरीजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, हभप डॉ.जनार्दन मेटे महाराज,देवगिरी प्रांत प्रमुख संजय आप्पा बारगजे व हजारो भाविक व अनेक संत महंत उपस्थित होते.
वाचक क्रमांक :