गोव्यातून स्वस्त दारू आणून महाग ब्रँडच्या बटलीत भरून विकणारे दोन जण अटकेत(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,19-06-2023
गोव्यातून कमी किमतीची दारू आणून महाग ब्रँडच्या दारूच्या रिकाम्या बाटलीत टाकून विक्री करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. दादासाहेब पांडुरंग मुटकुळे (२३, रा. मूळ मांडवा, ता. आष्टी, जि. बीड, ह.मु. सिडको वाळूज महानगर) आणि दिनेश सखाराम धायडे (२६, रा. मु.पो. घाणेगाव, गंगापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून चारचाकीसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांना बनावट दारू घेऊन संशयित येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने भेंडाळा फाटा येथे काळ्या रंगाची कार (एमएच ४६ डब्ल्यू ९३२९) थांबवली. या कारची तपासणी केली असता दारूच्या ५७६ सीलबंद बाटल्या सापडल्या. मुटकुळेकडे विचारणा केली असता त्याने वाळूज सिडको महानगर येथील भाड्याच्या घरात हा प्रकार करत असल्याचे सांगितले. नंतर पथकाने घरावर छापा मारून मुद्देमाल जप्त केला.
बाटलीवरील वेगवेगळ्या बॅच नंबरवरून फुटले बिंग
जप्त केलेल्या बाटल्यांच्या बॅच नंबरची शिंदे यांनी बारकाईने तपासणी केली तेव्हा प्रत्येक बाटलीचा बॅच नंबर वेगळा दिसला. याबाबत मुटकुळेला विचारले असता त्याने गोवा येथून दारू खरेदी करून या बाटल्यांमध्ये टाकून विक्री करत असल्याचे सांगितले.
वाचक क्रमांक :