रस्ता ओलांडताना दोन भावांसह तिघांना ट्रकने उडवले, दोन ठार, एक जखमी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय)
By : Polticalface Team ,19-06-2023
धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना तीन जणांना भरधाव वेगातील ट्रकने उडवले. त्यात दोनजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना आडगाव येथील पुलाजवळ रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, तीन जणांना उडविणारा ट्रकचालक फरार झाला आहे. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली.
पिन्टोसिंग प्रल्हादसिंग राजपुत (२२, रा. भिलवाडा, राज्यस्थान), गजानन देवराव मोहिते (४५, रा. हासनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना) यांचा मृतामध्ये समावेश आहे. कमलेशसिंग प्रल्हादसिंग राजपुत (२७, रा. भिलवाडा,राज्यस्थान) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. आडगाव परिसरातील धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना बीडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने तीन जणांना उडवले.
त्यात पिन्टोसिंग व गजानन हे जागीच ठार झाले. तर पिन्टोसिंगचा भाऊ कमलेशसिंग हा गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण आडगाव परिसरात एका ठेकेदाराकडे कामाला होते. अपघातानंतर जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर ट्रक चालक जखमींना सोडून पळून गेला. या घटनेची माहिती समजताच विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह घाटीत नेण्यात आले. त्याठिकाणी दोघांवर रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक खटाणे करीत आहेत.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.