योगेश मोरे यांच्या हॉटेलच्या होर्डिंगचे चक्रीवादळामुळे नुकसान,शासनाने नुकसान भरपाई द्यावी!
By : Polticalface Team ,19-06-2023
(ब्यूरो रिपोर्ट)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार,संगीतकार,कथा पटकथा लेखक तथा पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्यसचिव योगेश तुळशीराम मोरे यांच्या हॉटेल चवदार दाळबट्टी स्पेशलचे बॅनर होर्डिंग्जचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले, साधारणपणे सहा हजार रुपये रोख रक्कम खर्च करून हे बॅनर होर्डिंग्ज मोरे यांनी बनवले होते; तरी महाराष्ट्र सरकारने पत्रकार योगेश मोरे यांना रोख 6000 रुपये देवून आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी या बातमीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर पंचनामा व पाहणी करून दखल घेवून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी योगेश मोरे यांनी केली आहे.
अगोदरच महाराष्ट्र शासन शिकलेल्या मुलांना नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करून देत नसून,मोरे यांनी स्वतः कष्ट व मेहनत करून हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.
वाचक क्रमांक :