देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या जलारंभ कार्यक्रमाच्या तयारीसाठी गावनिहाय बैठका सुरू(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,19-06-2023
गंगापूर तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांना थेट जायकवाडी धरणातून शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन गंगापूर खुलताबाद तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रशांत बंब यांनी दिले होते , त्याप्रमाणेजवळपास गेली दहा वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर तालुक्यातील सर्वच नागरिकांचा अतिशय महत्त्वाचा विषय असलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर नल से जल या संकल्पनेला जोड देऊन तालुक्यातील सर्वच गावात थेट पाईप लाईन द्वारे जायकवाडी धरणातून शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण केले असून, त्यासाठी शुक्रवार दिनांक 30 /6 /2023 रोजी ठीक सकाळी दहा वाजता ठिकान गंगापूर येथील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली खाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते जलारंभ या कामाचा शुभारंभ होत असून या कार्यक्रमाच्या जय्यत तयारी साठी आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाने शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील हजारो शेतकरी , कार्यकर्ते उपस्थित राहणार असून त्यासाठी आज झोडेगाव तालुका गंगापूर येथे शेतकरी नेते माजी बांधकाम सभापती तथा लासुर बाजार समितीचे संचालक संतोष पाटील जाधव यांनी बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांना होणाऱ्या भव्यदिव्य कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :