ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव यांच्यातर्फे जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,19-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील अगर सायगाव या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज गरजू विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य गणेश भास्कर जाधव यांच्या वतीने तहानलेल्यांना पाणी द्यावे भुकेल्यांना अन्न द्यावे..! या रीतीने गावांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या,पेन वाटप करण्यात आले आणि त्यांच्यावर संपूर्ण गावांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.तसेच गणेश जाधव म्हणाले की,याही पुढे शालेय विद्यार्थ्यांना जीवनात काहीही आर्थिक स्वरूपाची अडचण आल्यास तरी सुद्धा माझ्या वतीने नक्कीच मदत करण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्वासन गणेश जाधव यांनी दिले.
वाचक क्रमांक :