मातंग समाजाच्यावतीने सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहास विनामोबदला जमीन(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,20-06-2023
आमदार रमेश बोरनारे व माजी नगराद्यक्ष दिनेश परदेशीं यांना समाजाच्या वतीने दिली लेखी परवानगी!
यंदाचा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा जागतिक रेकॉर्ड असलेला १७६ वा भव्य सप्ताह वैजापूर शहरातील लाडगाव चौफुली येथे होण्याचे नियोजित आहे.त्यामुळे याठिकाणी जागेची पाहणी सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज, सप्ताह कनिटीचे पदाधिकारी आमदार रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशीं, वैजापूर मर्चंन्ट बँकेचे अद्यक्ष विशाल संचेती यांनी केली असून, याठिकाणी वैजापूर शहरातील समस्त मातंग समाजाची सर्वे नं.१९० व १९१ मधीलसंपूर्ण जमीन मातंग समाजाची आहे;त्यामुळे आज सकल मातंग समाजाच्या वतीने सदर जमीन ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहास विनामोबदला वापरण्यास लेखी विनंती व परवानगी आज सप्ताह समिती चे पदाधिकारी,आमदार रमेश बोरनारे व माजी नगराद्यक्ष दिनेश परदेशी यांना समाजाच्या वतीने दिली आहे.
प्रतिक्रिया :- धर्मेंद्र त्रिभुवन :- मातंग कुळाची जमीन योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७६ व्या सप्ताहासाठी गुरूवर्य रामगिरी महाराजांनी पाहणी करुण निश्चित केली. हे मातंग समाजाचे भाग्य आहे. त्याचप्रमाणे सदर जमीन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होईल म्हणून मातंग समाजाच्यावतीने सदर संपूर्ण जमीन कुठलाही मोबदला न घेता सेवा म्हणुन
सप्ताहाकरीता देत आहोत.सदर सेवेचा सप्ताह कमेटी ने स्विकार करावा;अशी विनंती सप्ताह कमिटीला लेखी करण्यात आली आहे मांतग समाज हा पौराणीक काळापासुन दैविक आहे रामायणात शबरीमातेच्या उध्दारासाठी मातंग ऋषी यांनी राम भेटीपर्यंत आपल्या आश्रमात आश्रय दिला त्याच प्रमाणे द्वापार युगात जगाचा परमात्मा भगवान श्रीकृष्णाने संदिपान ऋषीच्या गुरूगृही राहुन शिष्यत्व पत्कारले अशा मातंग कुळाची जमीन साक्षात परब्रह्म असणाऱ्या सप्ताहास विनामोबदला वापरण्याची विनंती आम्ही समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
वाचक क्रमांक :