नागरिकांनी पोलिसांच्या नजरेने समाजात सतर्क रहावे : श्रीपाद परोपकारी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,20-06-2023

नागरिकांनी पोलिसांच्या नजरेने समाजात सतर्क रहावे : श्रीपाद परोपकारी(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी बँकेच्या रेल्वे स्टेशन रोड शाखेतील रात्र पाळीतील सुरक्षा रक्षक प्रवीणजी मकासरे यांनी नुकतीच धाडसी व जोखमीची कामगिरी करून एटीएम मशीनमध्ये छेडछाड करणाऱ्या भामट्याला शिताफीने पकडुन दिले . त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी चैतन्य मित्र मंडळाने दिनांक 19 जून 23 सोमवार रोजी त्यांचा सत्कार श्रीपाद मुकुंदराव परोपकारी, निवृत्त पोलिस उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी देवगिरी बँकेचे अधिकारी शखंदारे उपस्थित होते. प्रसंगी मकासरे व खंदारे यांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला..श्रीपाद परोपकारी यांनी विविध घटना आणि त्यात घेण्यात येऊ शकणारी काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांनी प्रास्ताविक केले;मंडळाचे जेष्ठ सदस्य शरदजी भोगले यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. डॉ. कमलाकर वैद्य यांनी मंडळाची उद्दिष्ट आणि योजनांची माहिती दिली. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष डॉ. सुरेश जोशी , कोषाध्यक्ष वैभव झाडगावकर आणि सचिव नितीन कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी देवजी भाई पटेल, प्रकाश देशपांडे,सुवर्णकार, चोपडा ,त्रिविक्रम जोशी ,प्रकाश तुपे , शिरीष कंदी,रावेरकर, आनंद महेंद्रकर ,विकास जाधव मंडळाचे सदस्य आणि बंसीलाल नगरातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.

अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा

ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम

सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.

रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.

चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश

मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज‌. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.

व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी

रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.

लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे

ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव

आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन

के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह‌ सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.

स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत

विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.