संत तुकाराम विद्यालयात योगदिन साजरा(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,21-06-2023
गंगापूर तालुक्यातील शिंगी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संत तुकाराम माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. भारतमातेच्या प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांनी योग-प्राणायाम प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी शालेय समिती अध्यक्ष दिगंबर पा. वाखुरे, शालेय समिती सदस्य बाबूलाल शेख यांच्यासह मुख्याध्यापक प्रमोद सोनवणे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :