By : Polticalface Team ,21-06-2023
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र,गुजरात, तेलंगणा, कर्नाटक व उत्तर भारतातील राज्य यांच्यातर्फे दिल्लीमध्ये संसद अधिवेशना दरम्यान दिनांक 26 जुलै 2023 रोजी जंतर मंतर या ठिकाणी, केंद्रातील भाजपा सरकारच्या भारतीय राज्यघटना लोकशाही विरोधी धोरणांच्या निषेधार्थ व मनुवादी , जातीवादी यांच्या धर्म जाती ध्रुवीकरणावरील, भाजपा व संघ परिवार यांच्या नफरत की राजनीति, शिवाय बहुजन समाज विरोधी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार यांची कामे यांचा तीव्र अधिकार करण्यासाठी पक्षांच्या राज्य शाखांच्या वतीने जाहीर धरणा आंदोलनाचे आयोजन पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर सुरेश माने यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे.
संपूर्ण एक दिवस सकाळी 11 ते सायंकाळी पाच पर्यंत चालणाऱ्या या धरणा प्रदर्शन कार्यक्रमांमध्ये, बी आर एस पी च्या पक्ष नेते यांच्याशिवाय इतर पक्षाचे नेते सुद्धा सामील होणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 27 जुलै 2023 रोजी पक्षाच्या वतीने दिल्ली येथे पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर माने यांच्या अध्यक्षतेखाली संविधान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या संविधान परिषदेचा प्रमुख हेतू म्हणजे बी आर एस पीच्या धोरणानुसार भारतीय राज्यघटनेतील राजकीय आरक्षणा नुसार निवडून येणारे अनुसूचित जाती जमातीचे देशभरातील 131 खासदार व अनेक राज्यातील जवळपास 1000 पेक्षा जास्त आमदार हे खरोखरच आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडीत आहेत काय आणि पार पाडत नसल्यास काय करणे आवश्यक आहे या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातील जाणकार तज्ञ शिवाय सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना देखील या कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात या महत्त्वपूर्ण विषयावर गांभीर्य पूर्वक चिंतन होऊन त्याद्वारे निर्माण झालेले निष्कर्ष हे भारत सरकारमधील सर्व संबंधिताना आवश्यक त्या कारवाईकरीता सादर करण्यात येणार आहे.
कारण आजपर्यंत बहुतेक वेळा हे 131 खासदार अनुसूचित जाती जमातीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न देशाच्या संसदेमध्ये उपस्थित करण्यामध्ये अपयशी ठरलेले असल्याने अशा राजकीय आरक्षणाचे औचित्य काय हा प्रश्न उभा राहिलेला आहे एवढेच नव्हे तर यांच्यावरील आर्थिक अनाठायी खर्च हा जनतेच्या करातून जमा केलेल्या निधीचा अपव्यय नव्हे काय याऐवजी हा निधी अनुसूचित जाती जमाती कल्याणकारी योजना करिता इतरत्र वापरता येणे शक्य आहे आणि म्हणून या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार होणे ही बी आर एस पी ची जाहीर भूमिका आहे. म्हणून या विषयावर महाराष्ट्रात विभागीय परिषदाचे आयोजन केल्यानंतर, पक्षाच्या पाच परिषदा या महाराष्ट्राबाहेर संपन्न होत असून यातील पहिली परिषद गुजरात येथे अहमदाबाद या ठिकाणी पार पडलेली आहे आणि पुढील परिषद ही दिल्लीमध्ये संपन्न होत आहे.
या दोन्ही कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून दोन ते तीन हजार कार्यकर्ते बीआरएसपी समर्थक हितचिंतक दिल्लीला रवाना होणार असून मराठवाड्यातून 500 ते 700 पक्षाचे समर्थ कार्यकर्ते यांच्यासह छत्रपती संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष विजय शिनगारे देखील या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न