पोलीस पाटील संघाच्या सल्लागार समितीच्या राज्यउपाध्यक्षपदी पांडुरंग पाटील जगताप(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,21-06-2023
गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव/गोपाळवाडी येथील पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील जगताप यांची महाराट्र पोलीस पाटील संघाच्या सल्लागार समितीच्या राज्यउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.दिनांक १८ जुन रोजी सकाळी ११ वाजता संभाजीनगर येथे हाॅटेल शगुन येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर राज्य कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे पाटील,राज्य सहसचिव गोरखनाथ पाटील टेमकर व मराठवाडा विभागीय अध्यक्ष जब्बार पठाण संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.यावेळी संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी सुचना आणि मत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या राज्यसल्लागार समितीच्या उपाध्यक्षपदी पांडुरंग पाटील जगताप, जिल्हाअध्यक्ष पदी कल्याणराव आगळे तर सचिवपदी शाम फाळके आणि जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जयश्रीताई पठाडे यांची नियुक्ती व इतर पदे नवनियुक्तीसंदर्भात संघाचे राज्यअध्यक्ष यांच्याकडे सुचित केली असता;सुचक व अनुमोदक यांनी वरील नवनिर्वाचित जिल्हाअध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष व जिल्हासचिव यांच्या नावाची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
वाचक क्रमांक :