गंगापूर-कायगाव रोडवरील खड्डे न बुजवल्यास एमआयएमचा मुंडन आंदोलनाचा इशारा(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,22-06-2023
गंगापूर ते कायगाव टोका मार्गावरील अपघातास कारणीभूत असलेले खड्डे न बुजवल्यास व तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील 100 फूट सोडण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास एमआयएम पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर मुंडन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एमआयएम पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर ते कायगाव टोका या रोडसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवला असून, या रोडवर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. आगामी पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून हे खड्डे दिसणार नाहीत?त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे व मार्गावर आता आषाढी एकादशीनिमित्ताने अनेक वारकरी बांधव पंढरपूरच्या दिशेने या मार्गाने जात असून तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी घोडेगाव येथील बाजारपेठेत याच मार्गाने जातात . तसेच अनेक भाविक याच मार्गाने आळंदी, देवगड, शनी शिंगणापूर येथे जात असतात . तसेच अनेक प्रवासी ही या मार्गाचा वापर करतात . परंतु या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात या मार्गावर खड्ड्यामुळे होत असल्याने अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. काल दिनांक 21 जून रोजी श्रीरामपूर तालुक्यातील संदीप शिंदे यांना या रोडवर आपला जीव गमवावा लागला आहे.तरी सुद्धा आपला विभाग गाढ झोपेत आहे.अशा होणाऱ्या वारंवार अपघातांमुळे हा रोड मृत्यूचा मार्ग झाला असून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावर प्रवास करावा लागत आहे, तसेच गंगापूर शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर अशाच प्रकारे 100 फुटाचा तुकडा सोडून देण्यात आल्या मुळे याठिकाणी खड्डे पडून अपघात होण्याची भीती निर्माण झालेली आहे. तरी आपणास एमआयएम पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येते की, गंगापूर ते कायगाव टोका या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवन्यात यावे व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर सोडून देण्यात आलेल्या 100 तुकड्याचे डांबरीकरण करण्यात यावे नसता आपल्या कार्यलयासमोर एमआयएम पक्षाच्या वतीने आपल्या विरोधात मुंडन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून,या निवेदनात ता. अध्यक्षराहुल वानखेडे, ता.संघटक वैभव खाजेकर, शहर अध्यक्ष फैसल बासोलान, ता.उपाध्यक्ष अशपाक सय्यद, युवा शहर अध्यक्ष नदीम खान, शहर सचिव इम्रान खान, सल्लागार सरवर जहुरी, मुबिन शेख आदींच्या सह्या आहेत.
अधिकारी नसल्याने एम आय एम च्या खुर्चीला निवेदन सादर:
गंगापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन्ही कार्यालयात एकही अधिकारी दुपारी 12 वाजेपर्यंत हजर नसल्याने एम आयएम पक्षाच्या वतीने याठिकाणी खुर्चीला निवेदन सादर करून निषेध व्यक्त केला.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी
रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.
लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव
आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन
के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.
स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत
विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.