लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड पोलिसांकडून जेरबंद

By : Polticalface Team ,22-07-2024

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड पोलिसांकडून जेरबंद दौंड ( प्रतिनिधी) दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक १७/०७/२०२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दौंड शहराच्या हद्दीमध्ये नगर मोरी चौकामध्ये महिला नामे ऋतुजा नामदेव पुकळे रा. संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर या एसटीची वाट बघत असताना पांढऱ्या रंगाची चार चाकी वाहन घेऊन एक अनोखी जवळ आला व म्हणाला की तुम्हाला कुठे जायचे आहे, मी नगरला चाललो आहे तुम्हाला नगरला सोडतो, असे म्हणून गाडीमध्ये बसून दौंडच्या हद्दी मध्ये असलेल्या सोनवडी गावच्या नदीच्या पुलाजवळ गाडी थांबवून सदर महिलेच्या अंगातील सोन्याची दागिने घेऊन तसेच बॅग घेऊन त्या महिलेला त्या ठिकाणी सोडून निघून गेला, याबाबत दौंड पोलीस स्टेशनला सदर महिलेने गुन्हा दाखल केला, या गुन्ह्याचा गंभीरता लक्षात घेऊन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी लागलीच डी बी पथक तयार करून गुण्याच्या तपासा कामे पाठवून दिले, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता हा गुन्हा प्रफुल्ल उर्फ बिंटू प्रकाश पानसरे वय२८ रा पाटस, ता. दौंड जि. पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले, सदर आरोपी हा वरवंड येथील चौकामध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे डी बी पथकाने सापळा रचून पानसरे याला ताब्यात घेतले, आरोपींनी चोरलेली गळ्यातील चैन व गुन्ह्यात वापरलेली गाडी असा पाच लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदर आरोपी हा अट्टल असून त्याने पुणे जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे केल्याचे नाकारता येत नाही त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, सदर कारवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केली आहे, या कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया दुरंदे, सुभाष राऊत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, शरद वारे, अमीर शेख, अमोल देवकाते, रवींद्र काळे, योगेश गोलांडे आदींनी भाग घेतला होता, या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया दुरंदे करीत आहेत, पानसरे याला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सुप्रिया दुरंदे यांनी दिली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.