गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून. दौंड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा समर्थ पुरस्काराने गौरव.
By : Polticalface Team ,25-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ जुलै २०२४. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सदगुरू स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वतीने दौंड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या मान्यवरांना समर्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या पुढाकाराने दौंड शहरातील स्वामी समर्थ मंदिरामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. गुरुपौर्णिमे निमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैभव कांबळे यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने समर्थ पुरस्काराचे मानकरी सन्मानीय डॉ.रोहन खवटे ( क्रीडा), डॉ.सुनिता कटारिया ( सामाजिक), प्रसाद पांडव ( पौराहित्य), रितेश ओझा ( धार्मिक ), ॲड.अक्षय शितोळे ( विधी ),उमेश जगदाळे ( उद्योजक ), रामदास मखरे ( शैक्षणिक), श्रीनाथ ननवरे ( राजकीय),, डॉ.प्रसाद कोल्हे ( वैद्यकीय) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सायंकाळच्या सत्रामध्ये हभप मयुरेश पोळ या बाल महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील अनेक साधकांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच गुरुपौर्णिमे निमित्ताने संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या वेळी भाविक साधकांनी महाप्रसादाचा स्वद घेतला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव कांबळे, बाळकृष्ण साळुंके, कल्याण कटके, जे एस. मांडाळकर, राजू पारख, वैभव टाटीया, अजय कुलकर्णी, नागेश साळुंके, श्रीधर गोलांडे, अशोक गायकवाड, प्रमोद भोसले, प्रमोद विधाते , सुनील औटी यांच्यासह मान्यवरांचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत