पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.
By : Polticalface Team ,16-06-2025
पुणे प्रतिनिधी अनिल गायकवाड
80:20 (80 महिलांमागे फक्त 20 पुरुष) Male - Female लिंग आधारित नर्सिंग(परिचर्या )भरतीतील अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर देशव्यापी आंदोलन होणार असल्याची माहिती अनिल बीडकर यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले हा केवळ विरोध नाही तर हजारो पुरुष परिचारकांच्या (Male नर्सिंग स्टाफ)अस्तित्वासाठी सुरू केलेला संविधानिक लढा आहे या नर्सिंग (परिचर्या)भरतीमध्ये 80% महिला आणि केवळ 20% पुरुषांना संधी देणारी व्यवस्था केंद्र सरकारचे धोरण ही केवळ लिंग भेद करणारी नाही तर भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 16 व 19 चा थेट अपमान करणारी असंवैधानिक वेवस्था आहे
ज्यांचं मनापासून परिचर्या क्षेत्रामध्ये सेवा व त्याग समर्पण आहे ज्या पुरुष नर्सिंग स्टाफ यांनी इंडियन नर्सिंग कौन्सिल INC आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल MNC/महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत मान्यतेच्या महाविद्यालयात नर्सिंग शिक्षण घेतले आहे अशा सेवकांना या लिंग भेदाच्या आधारावर झिडकारलं जातंय AIIMS DMER DHS या सारख्या अनेक शासकीय नौकरी पासून दूर ठेवले जाते स्त्रि पुरुष भेदभाव केला जात आहे याला संपूर्णपणे केंद्र व राज्य शासन जबाबदार आहे २२ जून २०२५ रोजी नवी दिल्ली जंतर मंतर येथे Joint Working Committee India च्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन होत असल्याचे बीडकर यांनी सांगितले
भारतातील नर्सिंग संघटना विद्यार्थी संघटना सामाजिक वैद्यकीय संघटना तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक परिचारिका संघटना विरोध आंदोलन करण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी हजारो नर्सिंग विद्यार्थी नर्सिंग स्टाफ नर्सिंग शिक्षक यांची महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जबाबदारी श्री.अजय मराठे नाशिक श्री आदी बनसोडे नांदेड श्री अविनाश ब्राह्मणे लातूर श्री भक्तराम फड सांगली श्रीमती मिना पटोले मुंबई श्री राहुल सानप परभणी श्री संतोष मोरे बीड व इतर सर्व पुरुष नर्सिंग ऑफिसर नेतृत्व करणार आहेत महाराष्ट्र राज्यात आम्ही ही चळवळ गावा गावात प्रत्येक नर्सिंग कॉलेज -विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती केली जात आहे
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पुरुष नर्सिंग ऑफिसर्स यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी सर्व महिला नर्सिंग स्टाफ देखील आवाहन करत असुन अनेकांनी या आंदोलनासाठी पाठींबा दर्शविला आहे आमचा लढा हा केवळ लाखो नर्सिंग विद्यार्थ्यांचा नाही तो समानतेच्या तत्त्वावर भारताच्या संविधानाचा असून शिक्षण नोकरी आणि सेवा–या कोणत्याही क्षेत्रात लिंगभेदाला स्थान नाही हे दर्शवण्यासाठी आहे भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला संधी देत आहे – मग ती संधी कोणत्याही जाती धर्म लिंग भेद करणारी किंवा त्यावर आधारित का असावी हा खरा प्रश्न उपस्थित केला जात असुन जनसामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या पुरुष नर्सिंग ऑफिसर यांना भेडसावत आहे हे युद्ध पुरुषां विरुद्ध महिलांचं नाही तर हे युद्ध आहे लिंग भेदावर आधारित अन्याया विरुद्ध आहे
प्रत्येकाला गुणवत्तेच्या आधारे संधी मिळाली पाहिजे या साठीच लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. शिक्षणात लिंग भेद का केला जात आहे. गुणवत्ता आणि समर्पण हाच निकष असावा महाराष्ट्रातील प्रत्येक नर्सिंग विद्यार्थी व परिचारक यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आज आपण गप्प बसलो तर उद्या हक्क मागण्यासाठी उभं राहण्याची ही संधी मिळणार नाही त्यामुळे चला एकत्र येऊया न्यायासाठी संधीसाठी समानतेसाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरले पाहिजे हे आंदोलन भविष्यातील उद्याची दिशा ठरवेल असा विश्वास व्यक्त करत अनिल जायभाये बीडकर यांनी आवाहन केले आहे.
वाचक क्रमांक :