श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

By : Polticalface Team ,13-06-2025

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन यासारख्या मागण्यांसाठी अमरावतीतील मोझरी येथे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी ८ जून २०२५ पासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता श्रीगोंदा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, याबाबत नाराजी व्यक्त करत श्रीगोंदा तालुका प्रहार संघटनेने तहसीलदार श्रीगोंदा यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले. या निवेदनात बच्चूभाऊ कडू यांच्या लोकहितार्थ सुरु असलेल्या आंदोलनाचे समर्थन करत तातडीने त्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. "जर शासनाने वेळेवर योग्य निर्णय घेतला नाही, तर श्रीगोंदा तालुका प्रहार संघटनेच्यावतीने कोणतीही पूर्वसूचना न देता संविधानिक मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील," असा स्पष्ट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी प्रहार संघटनेचे माधव बनसूडे, गुरु गायकवाड, कृष्णा खामकर, अमोल कांबळे, ज्ञानेश्वर भैलुमे तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, संजय रणसिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्षाची ही भूमिका शेतकरी व दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी बळ देणारी असून आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके

बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.

छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!

शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड

करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल