नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा
By : Polticalface Team ,14-06-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी) -सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे हे दि 15 ते 23 जून या कालावधीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ब्राझील अभ्यास दौऱ्यात सहभागी होत आहेत. त्यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांनी महासंघाचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि 15 ते 23 जून या कालावधीत ब्राझील देशातील साखर उद्योगाचा अभ्यास करणेकरिता अभ्यास दौऱ्याचे आयोजन केलेले आहे. सदर दौऱ्यामध्ये नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांच्यासह हरियाणाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, आमदार विश्वजीत कदम, राहुल आवाडे, , कल्याणराव काळे, प्रमोद जाधव, अभिजीत पाटील, फेडरेशनचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईक नवरे, हरियाणाचे कॅप्टन शक्ती सिंग यांच्यासह देशातील काही नामवंत साखर कारखान्याचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. त्यांचा प्रवास निर्विघ्न पार पाडावा व दौरा यशस्वी व्हावा याकरिता कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या हस्ते नागवडे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते.
स्वर्गीय शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या विचार प्रेरणेतून नागवडे कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासद- शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. ब्राझील अभ्यास दौऱ्यामुळे ऊस शेती व साखर धंदा यांचा अधिक अभ्यास करण्याची संधी मिळणार असून त्याचा फायदा भविष्यात आपणास होईल असे प्रतिपादन राजेंद्र नागवडे यांनी यावेळी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले
धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके
बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!
महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.
दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.
छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!
शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या
वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर
आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड
करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद
पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.
सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन
श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा
नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा
रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम
दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी
श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल