शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
By : Polticalface Team ,16-06-2025
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- 16 जून रोजी प्राथमिक माध्यमिक शाळांची नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या आगमनाने सर्वत्र शाळा परिसर देखील गजबजू लागला. 16जुन पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शासनाकडून देखील प्रतिवर्षाप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले आहे; त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात सर्वच प्राथमिक; माध्यमिक; उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासन व शालेय व्यवस्थापन समितीकडून शालेय पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजी पाचवीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यालय व शालेय व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर नागवडे कारखान्याचे संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे; माजी संचालक व स्कूल कमिटीचे विश्वस्त विलासराव काकडे; पुरुषोत्तम बापू लगड; मोहनराव काकडे; माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे; विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे; शब्बीरभाई शेख; सचिन जगताप; संतोष भोसले आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
* पहिल्याच दिवशी श्री व्यंकनाथ विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षां निमित्त सर्व शालेय विद्यार्थ्यांना गोड जेवणाचा आस्वाद देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत म्हणाले की; प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने विद्यालयाची शिस्त पाळावी; भरपूर अभ्यास करून गुणात्मक दर्जा वाढवावा; शालेय स्तरावर ज्या अडचण येतील त्या वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांना तात्काळ सांगाव्यात विद्यालयाच्या शालेय शिस्तीला बाधा येईल असे वर्तन होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. असे सांगून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शनपर भाषणात नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे यावेळी म्हणाले की; शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयाने उत्कृष्ट नियोजन केले आहे. विद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने तन-मन-धनाने अभ्यास करून विद्यालयाच्या दहावीच्या निकालाची परंपरा यापुढेही कायम ठेवावी; असे सांगून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ तत्पर आहे. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे; शालेय शिस्तीचे पालन करावे; कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण भासली तर ती कार्यालयात येऊन आम्हाला सांगावी. त्याचे तात्काळ निराकरण केले जाईल. असे सांगून प्राचार्य पुराणे पुढे म्हणाले की; विद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ज्यादा तासाचे देखील नियोजन केलेले असून; विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून आपली शैक्षणिक उंची वाढवावी; असे आवाहन करत नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले आभार उपशिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :