सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

By : Polticalface Team ,15-06-2025

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन लिंपणगाव( प्रतिनिधी)- सेवानिवृत्त तहसीलदार अर्जुनराव रामचंद्र काळे उर्फ दादा (वय 90) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. अर्जुनराव काळे यांनी महसूल विभागात सेवेत असताना जामखेड; कर्जत; श्रीगोंदा; पारनेर; धुळे; जळगाव; राहुरी; रावेर इत्यादी ठिकाणी प्रामाणिकपणे व उत्तम प्रकारे सेवाकाल केला. त्यामध्ये श्रीगोंदा येथे देखील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून उत्तम प्रकारे काम केले. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय कसा मिळेल; यासाठी देखील त्यांनी भरीव असे सर्वांनाच सहकार्य केले. निवृत्त तहसीलदार कै. काळे यांच्या निधनाची बातमी समजताच श्रीगोंदा तालुक्यातील अनेक मान्यवर व्यक्तींसह सर्वसामान्यांनी दुःख व्यक्त केले. कै.अर्जुनराव काळे हे अत्यंत शांत व शिस्तप्रिय; मितभाषी; स्वभावाचे होते. कुटुंब व्यवस्थेमध्ये त्यांनी आपल्या मुला- मुलींना उच्च शिक्षित करून ते आज सर्वच विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.कै. अर्जुनराव काळे हे महसूल विभागात सेवेत असताना अनेकांचा त्यांच्याशी जवळून संबंध आला. त्यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने हळहळ व्यक्त केली आहे. कै. अर्जुनराव काळे यांचा मुलगा डॉ अनिल काळे हे शासकीय कृषी महाविद्यालय हळगाव येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ते जैवतंत्रज्ञान व जीवरसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून पदभार संभाळत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी; एक मुलगा; दोन मुली; दोन भाऊ; पुतणे; सुन; नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. अर्जुनराव काळे हे इंदिरा गांधी विद्यानिकेतन या विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती सुरेखा काळे व डॉक्टर अनिल काळे यांचे वडील तर मुख्याध्यापक कांतीलाल तनपुरे यांचे सासरे होत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके

बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.

छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!

शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड

करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल