दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

By : Polticalface Team ,19-06-2025

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १७ जून २०२५ दौंड तालुक्यातील मौजे आलेगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील प्रशांत सुभाष कदम यांचे घराचे कुलूप तोडून घरातील ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच मौजे देऊळगाव राजे ता दौंड जिल्हा पुणे येथील माऊली मधुकर अवचर यांच्या घरातील सोन्याचे दागिने १ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून दोन घरातील एकुण ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने आलेगाव आणि देऊळगाव पंचक्रोशीतील सर्व सामान्य शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या बाबत अधिक माहिती अशी की प्रशांत सुभाष कदम वय ४२ वर्षे रा.आलेगाव कदम वस्ती ता दौंड जि.पुणे यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली हि घटना दि १७/०६/२०२५ रोजी सकाळी ११ वाजे सुमारास फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून प्रशांत सुभाष कदम यांचे घरातील सोन्याचे दागिने सह रोख रक्कम असे ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच देऊळगाव राजे येथील माऊली मधुकर अवचर यांच्या घरातील सोन्याचे दागिने सह रोख रक्कम असे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असल्याने अज्ञात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी दुपारी ०३ वाजे दरम्यान जेवण करण्यासाठी व गुरांना चारा टाकण्यासाठी त्यांची पत्नी ज्योती असे राहत्या घरी आले तेंव्हा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले व कोयंडा कोणीतरी तोंडलेला दिसून आले तेंव्हा फिर्यादीने घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील कपाट उघडे व कपाटातील सर्व साहित्य अस्थाव्यस्त जमीणीवर पडलेली दिसले फिर्यादी ची पत्नी ज्योती हिने कपाटाची पाहिणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांना मिळुन आली नाही. तेंव्हा फिर्यादीने घराच्या आजुबाजुला पाहणी केली असता तेथे कोणी मिळुन आले नाही. तेंव्हा खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराची कडी कोयंडा कुलूप तोडुन घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी करून चोरून नेले आहेत. असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे त्याचे वर्णन खालील प्रमाणे १) २ लाख ७५ हजार रूपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मोठे गंठण ५ तोळे ५ ग्रॅम वजनाचे. २) १ लाख रूपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण २ तोळे वजनाचे ३) २५ हजार रूपये किंमतीची कानातील सोन्याचे रिंग ५ ग्रॅम वजनाचे ४) ५० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन ५ ग्रॅम वजनाच्या अंगठया ५) १ लाख रूपये रोख रक्कम त्यामध्ये ५०० रू दराच्या भारतीय चलनाच्या २०० नोटा असे एकूण ५ लाख ५० हजार रूपये किंमतीचा वरिल वर्णनाचा मुद्देमाल दि. १७/०६/२०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजे दरम्यान मौजे आलेगाव कदम वस्ती ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीतून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरफोडी करून चोरून नेले आहे. त्याच प्रमाणे मौजे देऊळगाव राजे ता दौंड जि पुणे येथील इसम नामे माऊली मधुकर अवचर रा.देऊळगाव राजे ता दौंड जि पुणे यांचे घरी देखील घरफोडी झाली असल्याचे फियादीला समजले तेंव्हा त्यांच्याशी संपर्क करून माहिती घेवून आम्ही दोघेही दौंड पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यासाठी आले. माऊली अवचर यांच्या घरातील अर्धा तोळे वजनाचे कानातील सोन्याचे फुले व लहान मुलाच्या दोन अंगठया १० ग्रॅम वजनाच्या व बदाम ५ ग्रॅम वजनाच्या आणि २५ हजार रुपये रोख रक्कम असे एकुण १ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरी करून नेल्या कारणावरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल ठाणे अंमलदार. पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके

बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.

छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!

शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड

करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल