वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर
By : Polticalface Team ,16-06-2025
करमाळा प्रतिनिधी वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळा येथील उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसु नंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये निर्भीडपणे कार्यक्षमतेने काम करणाऱ्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक राजकीय शिक्षण पत्रकारिता उद्योग व्यवसाय इंजिनिअर वकील पोलीस सैनिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येत असतो. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा शाखा अध्यक्ष म्हणूनही संतोष काका कुलकर्णी काम करत असून भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही ते काम करत आहे. भाजपच्या तालुकाध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना बँक फाईल करून उद्योग व्यवसायात सहकार्य करून यशस्वी केले आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांनी क्लासिक ऑईल कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यामध्येही आपल्या ऑइल कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये कुठलीही पार्श्वभूमी नसताना जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर आदर्श उद्योजक म्हणून करमाळा तालुक्यात त्यांचा नावलौकिक आहे. संतोष काका कुलकर्णी यांच्या कार्याची दखल वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांनी घेतली असून जीवनात मानाचा तुरा रोवणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट राष्ट्रीय व्यावसायिक पुरस्कार 2025 यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी फाउंडेशन चा उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब होशिंग, राजुरी चे सरपंच राजेंद्र भोसले, संजय सारंगकर, आबासाहेब टापरे,पत्रकार संजय कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचक क्रमांक :